UP Election: उत्तर प्रदेशात योगीचं जोरदार पुनरागमन, तिकडं पाकिस्तानात संताप

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालावरून हे स्पष्ट होतय की, सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी यूपीची सत्ता काबीज करणार आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचा गदारोळ देशातच नाही, तर पाकिस्तानातील जनतेच्याही नजरा या निवडणुकीकडे लागल्या होत्या. निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या पुनरागमनावर पाकिस्तानकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोशहराफ झैदी यांनी म्हटले आहे की, योगींच्या विजयामुळे भारताची दिशा आता बदलणार नाही.

त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘योगी आदित्यनाथ यांचा यूपीमधील विजय सूचित करतो की, भारत आता आपला मार्ग (हिंदुत्वाच्या राजकारणातून) बदलणार नाही. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. याबाबत अनेक जण अगोदरच इशाराही देत ​​होते.

2019 नंतरच्या धाडसी भारताशी सामना करण्यासाठी पाकिस्तानने तयार असले पाहिजे, असंही मोशहराफ झैदी यांनी म्हटलं आहे.