बाहेर जाताना मास्क वापरा, व्यायाम करा; प्रदूषणमुक्त सप्ताहाच्या निमित्ताने राज्यसरकारने दिला सल्ला

पुणे – बाहेर जाताना मास्क वापरा, व्यायाम करा, प्रदूषणमुक्त इंधन वापरा अशा अनेक सूचना राज्यसरकारने जारी केल्या आहेत. दि. २ ते ८ डिसेंबर हा वायू प्रदूषणमुक्त सप्ताह आयोजित केला जातो. त्या पार्श्वभूमीवर या सूचना असल्या, तरी त्याचा कायमस्वरूपी अवलंब व्हावा, असेही राज्यसरकारने सुचवले आहे.

वायूप्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वसामान्यांना हानी कमी करण्यासाठी अॅडव्हायझरी जारी केली आहे. लोकांनी बाहेर पडताना मास्क घालावे, विशेषत: प्रदूषणाची पातळी जास्त असताना, लोकांनी घरीच व्यायाम करावा, स्वयंपाक करताना प्रदूषणमुक्त इंधन वापरावे, अधिक झाडे लावावीत आणि कचरा जाळू नये, अशा या सूचना आहेत.

वायू प्रदूषणामुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दि. २ डिसेंबर हा वायू प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून ओळखला जातो. हवामान बदल आणि मानवी आरोग्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून एक आठवडाभराची मोहीम राबवण्यात आली होती.

प्रदूषणाची पातळी वाढत असताना आम्ही लोकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. याचे कारण हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी वाढते. तसेच लोकांना बाहेरील प्रदूषणाच्या संपर्कात येऊ नये म्हणून घरामध्ये व्यायाम करण्यास सुरुवात करावी, असा सल्ला दिला आहे. उच्च वायू प्रदूषण पातळी कारणीभूत ठरू शकते. श्वसनाचे आजार आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग तसेच व्यक्ती आणि लोकसंख्येचे एकूण आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सरणीकर यांनी सांगितले.

खोकला, श्वासाचे रुग्ण वाढले

वाढत्या वायू प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम निश्चितच वाढला आहे. घसा खवखवणे आणि श्वासोच्छवासाच्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सततचा खोकला विशेषत: ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील. रुग्ण तीन ते चार दिवसात बरा होतो, पण आता त्याला जवळपास आठ ते नऊ दिवस लागतात. तसेच औषधे पूर्वीसारखी काम करत नाहीत, तर पूर्वी अँटी-एलर्जी काम करत असत. ते करत नाहीत आणि आम्हाला डोस आणि औषधे बदलावी लागतात, असे फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. आशिष धोत्रे म्हणाले.