Uttarakhand Tunnel Crash : बोगदा दुर्घटनेत अडकलेल्यांची दीडशे तासांनंतरही सुटका नाही

Uttarakhand Tunnel Crash – उत्तराखंड मधील उत्तरकाशी (Uttarakhand Tunnel Crash) जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळल्याने त्या बोगद्यात जे अडकले आहेत, ते गेली दीडशे तास आत अडकून पडले असून अजून त्यांच्या सुटकेसाठीचा प्रयत्न दृष्टीक्षेपात आलेला नाही.

घटनास्थळी आता नवी प्रभावी यंत्रणा आणण्यात आली असून या अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली असून त्यांच्या राहण्या जेवणाची सोय तेथील सरकारने केली आहे.

या बोगद्यात 41 जण अडकले असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारच्या विविध यंत्रणा तेथे कार्यरत असून मोठ्या मशिन्सच्या सहाय्याने तेथे ड्रिलिंग केले जात आहे.

दरम्यान आत अडकलेले बहुतेक जण अद्याप सुरक्षित आहेत असा दिलासा अधिकाऱ्यांनी दिला. ड्रिलिंग सुरू असताना आतून मोठमोठे आवाज येत असल्याने काल रात्री काही काळ येथील ड्रिलिंगचे काम थांबवण्यात आले होते परंतु आता पुन्हा नव्याने बचाव कार्याचे काम सुरू आहे.

आज घटनास्थळी नवीन प्रभावी ड्रिलींग मशिन्स येथे आणण्यात आली आहेत. ही मशिन्स मध्यप्रदेशातील इंदौर येथून विषेश विमानाने आणण्यात आली आहेत. त्यासाठी हवाईदलाच्या सी 17 या मालवाहू विमानांचा वापर करण्यात आला.

यमुना एक्‍स्प्रेस वर हा बोगदा आहे. आत अडकलेल्या लोकांना अन्न, पाणी आणि ऑक्‍सीजन पाईपद्वारे पुरवले जात आहे आणि त्यांच्याशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधला जात आहे.