केसनंद येथे एकाच दिवसात 1000 जणांचे लसीकरण

वाघोली : केसनंद तालुका हवेली येथे जोगेश्वरी विद्यालयाच्या प्रांगणात एकाच दिवसात केसनंद  ग्रामपंचायत व स्विजर प्रोसेस इस्टुमेन्ट प्रा. लि. यांच्या  माध्यमातून एकाच दिवसात 1,000  एक हजार लसी नागरिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली.

यावेळी सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रुपाली गणेश गावडे, माजी सरपंच रोहिणी जाधव, माजी उपसरपंच सुनीता झांबरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे, दत्तात्रेय हरगुडे, सचिन हरगुडे, विशाल हरगुडे, धनाजी हरगुडे, सुनिता हरगुडे, सुजाता गायकवाड, अक्षदा हरगुडे, रेखा बांगर, भारत हरगुडे, ज्योती हरगुडे, आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.