Chess Variant Tournament 2024 : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा येणार आमने-सामने , ‘या’ दिवशी रंगणार सामना…

Casablanca Chess Variant Tournament 2024 : पाच वेळचा विश्वविजेता आणि महान बुद्धिबळपटू भारताचा विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असणारा नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही दिग्गजांना मोरक्को शहरातील कासाब्लांका येथे होणाऱ्या चेस वैरिएंट स्पर्धेत (Chess Variant Tournament 2024)खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 18 आणि 19 मे रोजी होणाऱ्या या स्पर्धेत अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि इजिप्तचा बासेम अमीन हे देखील खेळणार आहेत.

भारतीय ग्रँडमास्टर प्रवीण थिप्से यांच्या मते ही स्पर्धा सामान्य नसून वेगळी असेल. दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू सहा खेळ खेळणार आहे. आयोजक खेळाडूंना सामन्यादरम्यान बुद्धिबळ मास्टर्समध्ये खेळल्या गेलेल्या लढतीतील खेळांचे स्थान देतील. तेथून इतर खेळाडूंना पुढे खेळ न्यावा लागेल. सामन्यापूर्वी खेळाडूंना दोन मिनिटे बुध्दीबळपटूंच्या चाली पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर त्यांना खेळ खेळायला मिळेल. हा एक आकर्षक प्रयोग असल्याचे ठिप्से सांगतात. बुद्धिबळाला लोकप्रिय करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Indian Football : भारतीय चाहत्यांना मोठा धक्का..! कर्णधार सुनील छेत्रीची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, भावुक करणारा व्हिडिओ पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती…

आनंद आणि कार्लसन यांना जगातील सर्व खेळाडूंचे स्थान माहीत आहे, असे थिप्से यांचे मत आहे. खेळाडू ‘ड्रॉ’साठी सुध्दा सहमती दर्शवू शकणार नाही. आनंद तयारीनिशी इथे गेला तर त्याचा फायदा होईल. प्रत्येक गेम 15 मिनिटांसाठी खेळला जाईल.