पुणे जिल्हा | काळभोर महाविद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम

लोणी काळभोर, (वार्ताहर) – येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानंतर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. या वेळी साक्षी चव्हाण हिने गणेशवंदना सादर केली.

सावित्रीबाई फुले यांची ओवी साक्षी शितोळे हिने सादर केली. टिकटॉकवाली सून या नाटकामध्ये साक्षी चव्हाण, श्रुती काळभोर व अंजली वाघमारे यांनी अतिशय सुंदर अभिनयाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. मयुरी चव्हाण हिने अतिशय उत्कृष्ट नृत्य सादर केले. मनप्रीत राठोड हिने रिमिक्स पंजाबी गाण्यावर तर प्रणाली खाटमोडे हिने हिंदी गाण्यावर नृत्य सादर केले.

डॉ. एस. एस. पाटील यांनी माझी बायको ही सुंदर कविता सादर केली. ’गेली माझी सख्खी बायको गेली’ या हास्य नाट्यावर अविनाश खांडेकर, सुमित साळवी, अंजली वाघमारे, श्रेया घाडगे, साक्षी शितोळे, नितीन जाधव, वैभव वाघमारे, प्रणाली खाटमोडे, श्रुती काळभोर यांनी नाटक सादर केले. यावेळी प्राचार्य ए. के. मंजूळकर, विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर भिसे यांनी तर नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पी. एम. खनुजा यांनी केले.