पिंपरी | वावोशी गावाला मिळाली नवी जलवाहिनी

खालापूर, (वार्ताहर) – अगोदरच पाणी टंचाईचे संकट ओढावलेल्या वावोशी गावातील पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहिनीला गळती लागल्यामुळे वावोशी गावातील महिलांवर पाणीटंचाईचे संकट वाढत चालले होते. निकृष्ट झालेल्या वाहिनीमधून पाणी वाया जात होते.

याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना ही माहिती देताच सावंत यांनी गावातील नादुरुस्त जलवाहिनीच्या जागी नवीन वाहिनी टाकली. परिणामी गावचे जलसंकट टळले.

खालापूर तालुक्यातील वावोशी गाव हे ऐतिहासिक गाव आहे. मात्र, या गावाला पाणी टंचाईचे संकट दरवर्षी ओढावले जाते. याकडे स्थानिक प्रशासनाचे होत असते. वावोशी गावातील साठवण टाकीपासून गावातील कानाकोपऱ्यात गेलेल्या जलवाहनी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे दरवर्षी पाणी संकटाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.

ही बाब शिवसैनिकांंनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सांगितलल्यावर त्यांनी तात्काळ जलवाहिनी बदलली. त्यामुळे वावोशीगावातील महिलांनी नितिन सावंत यांचे खास आभार व्यक्त केले. तसेच त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, पंढरीनाथ राऊत, सरपंच महेश पाटील, खरिवली पंचायत समिती विभागप्रमुख कल्पेश पाटील, प्रविण पाटील, तानाजी शिंदे आदी उपस्थित होते.