Video : ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर अभिषेक बच्चनने मारला झणझणीत मिसळावर ताव..!

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा ‘घूमर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील या सिनेमाचं आणि अभिषेकच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील लेकांचं कौतुक केलं असून, सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी सिनेमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘घूमर’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिषेक बच्चनने पाच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोन्ही कलाकार “चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. मात्र, यावेळी प्रमोशन बाजूला ठेवून अभिनेता चक्क मिसळवर ताव मारताना दिसला. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

यावेळी अभिषेकनं सांगितलं की त्याला मामलेदारची मिसळ खुप आवडते. तो नेहमी ती मिसळ खातो. यावेळी बिग बी पण मिसळ खातात का असा प्रश्न जेव्हा निलेश साबळे विचारतो तेव्हा अभिषेक म्हणाला की,

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

‘नाही, नाही सगळी मिसळ तोच खाऊन टाकतो त्यामुळे त्यांना काही उरतच नाही.’ आणि यावेळी अभिषेक मिसळवर ताव मारतो आणि सैराटच्या झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही करतो. हा मजेदार भाग 21 ऑगस्ट (सोमवार) रोजी प्रसारित होणार आहे.