#video : “पुढील 25 वर्ष तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत’; अमोल मिटकरींची खोचक टीका

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली असून, डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनालाही अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अश्यातच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा’ असा सल्ला दिला.

मात्र, रामदास आठवलेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपलं व्यक्त करत खोचक टीका केली. “पुढील 25 वर्ष तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत..’ अश्या शब्दात मिटकरींनी टोला लगावला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.