VIDEO: ‘मी तुम्हाला बोलावले नाही’, परिणीती चोप्रा पापाराझींवर भडकली

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच आपचे (AAP) आमदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 13 मे रोजी त्या दोघांचाही साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता या दोघांचा विवाह सोहळा 23 आणि 24 सप्टेंबरला राजस्थानमध्ये पार पडणार आहे. सध्या सर्वत्र परिणीतीच्या लग्नाची चर्चा सुरू होत असतानाच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परिणीती गाडीतून उतरत असताना ती पापाराझींच्या (Paparazzi) कॅमेरात स्पॉट झाली. त्यांना पाहताच परिणीती भडकली. तसेच त्यांना रागात म्हणाली, ‘मी तुम्हाला बोलावलं नाही तरी तुम्ही येथे का आले?’ रागातच परिणीती आतमध्ये गेली आणि पुन्हा बाहेर येत म्हणाली, ‘सर बस करा, मी तुमचा आदर करते’ असे बोलून परिणितीने पापाराझींसमोर हात जोडले. पापाराझी देखील तिला सॉरी म्हणाले. सध्या तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 5 Dariya News (@5dariyanews_)

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 24 सप्टेंबरला हे जोडपे लग्न करणार आहे, तर लग्नाआधीचा उत्सव एक दिवस आधी सुरू होईल. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये बहुतांश सोहळे होणार असले तरी विवाह सोहळ्याचे ठिकाण ताज तलाव असणार आहे. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता परिणीतीच्या चुरा समारंभाने या सेलिब्रेशनची सुरुवात होईल, त्यानंतर दुपारी 12-4 वाजता स्वागत लंच होईल.

कुटुंब, तसेच वधू आणि वर रात्री 7 PM पासून पार्टी करतील. 90 च्या दशकाप्रमाणे या पार्टीची थीम असणार आहे. लग्नानंतर हे जोडपे 30 सप्टेंबर रोजी चंदीगडमध्ये लग्नाचे रिसेप्शन आयोजित करणार आहे. अनेक राजकीय नेते परिणीती आणि राघवच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांचा ‘मिशन रानीगंज’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.