VIDEO : रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हांचे घेतले आशीर्वाद; ‘या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं

मुंबई – अभिनेत्री रेखा वयाच्या 69 वर्षात देखील फार सुंदर दिसतात. आजही त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केले जाते. अनेकदा त्या इव्हेंट्स आणि पार्टीमध्ये दिसते. मात्र आजही आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 28 ऑक्टोबरला आंद्रे टिमिन्स यांचा मुलगा लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेत्री रेखा उपस्थित होत्या. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र रेखा यांची एक कृती विशेष चर्चेत आली आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लेस्ली टिमिन्सच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत शत्रुघ्न सिन्हाही त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि कुटुंबासह या कार्यक्रमात पोहोचले होते. या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी देखील हजेरी लावली होती. परंतु रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पाहताच त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेताला. रेखा शत्रुघ्न सिन्हा यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. ही कृती पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले. त्यानंतर रेखा यांनी शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा यांनाही मिठी मारली. सध्या रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी रेखा यांचे कौतुक केले आहे. ‘रेखाजींबद्दलचा आदर आणखी वाढला,’ ‘मोठ्यांचा आदर केला पाहिजे हे चांगले आहे,’ ‘रेखाजींना आदर कसा करायचा हे चांगले माहित आहे.’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या पार्टीत रेखा यांनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. ज्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या.