Video: रेल्वे ट्रॅकवर सेल्फिच्या नादात महिलेचा पती आणि मुलांच्या डोळ्यासमोर मृत्यू, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Selfie train accident : रेल्वे ट्रॅकवर सेल्फीच्या नादात एका महिलेला पती आणि मुलाच्या डोळ्यादेखत जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणार हा व्हिडिओ मेक्सिकोमधील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दिसत आहे की, एका रेल्वे ट्रॅकजवळ अनेक पर्यटक उभे आहेत. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येकाने आपला मोबाईल हातात धरला आहे. ही लोकं ट्रॅकच्या जवळ आहेत. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मेक्सिकोत्या हिडाल्गो येथे वाफेची इंजन असलेली जुनी ट्रेन या मार्गावरुन धावते. या ट्रेनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी दररोज या ठिकाणी पर्यटक येत असतात. याच दरम्यान सेल्फीच्या नादात एका महिलेने आपला जीव गमावला आहे.

या ट्रेनचे नाव ‘एम्प्रेस’ आहे. वाफेची इंजिन असलेल्या ट्रेनबरोबर फोटो घेण्याची पर्यटकांमध्ये उत्सुकता असते. घटनेच्या वेळीही या ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी जमलेली व्हिडिओत दिसत आहे. याचवेळी एक महिलेला ट्रेनबरोबर सेल्फी घेण्याचा मोह झाला. मोबाईलचा कॅमेरा ऑन करत ती महिला ट्रॅकच्या अगदी जवळ जाते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत ही महिला आपल्या लहान मुलाला जवळ घेऊन सेल्फी घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. तेवढ्यात ट्रेन आली आणि महिलेच्या डोक्याला जोराचा मार बसला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.