विरार अग्नितांडव! मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून २ लाखांची आर्थिक मदत जाहीर

वसई : वसई-विरार येथे करोना रुग्णालयाला लागलेल्या आगोत 13 जणांचा मृत्यू झाला. विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग सुरुवातीला पसरली. तेथे करोना बाधितांवर उपचार सुरू होते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपात्कालीक निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहिर केली आहे. तर यात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

रुग्णालयाच्या अतिदक्षाता विभागातील वातानुकूलित यंत्रणेतून आग पसरली. तेथे त्यावेळीब 18 जण उपचार घेत होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. पाचच मिनिटांत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी पाच वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

आग आटोक्यात आणल्यावर महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने 21 रुग्णांना जवळपासच्या रुग्णालयात हलवले.विरार मधील करोना रुग्णालयात लागलेल्या आगीची दुर्घटना दुर्देवी आहे. यात प्राण गमावलेलयांविषयी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त करतो, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या दुर्घटनेत मरण पावलेल्या रुग्णाविषयी शोक व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. अन्य रुग्ण अन्य रुग्णालयात तातडीने हलवण्याचे आदेश दिले. तुआंनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्र्यानी आगीचे वृत्त समजताच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

आग पूर्ण नियंत्रणात आणण्याला प्राधान्य द्या. त्याचबरोबर अन्य रुग्णांच्या उपचारावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. ही आग लागली तेंव्हा रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते असे पिटीआय च्या बातमीत म्हटले आहे. या आगीचे योग्य कारण शोधून काढा. तसेच रुग्णालयांमध्ये अग्निशान यंत्रणा योग्य स्थितीत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन सिलेंडरमधील गळतीने 22 जणांचा मृत्यू होऊन दोन दिवस होतात न होतात तोच ही दुदैवी घटना घडली.

Leave a Comment