संघ कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या स्वयंसेवकला अटक

कोची : पोलिस चौकी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला केरळ पोलिसांनी अटक केली. ही घटना 16 जानेवारीला घडली होती. त्याला तमिळनाडूतील कोईमतूर येथून अटक करण्यात आली.

संघाचे कार्यालय असणाऱ्या कथीरूर मनोज स्मृती केंद्राजवळील पोलिस चौकीवर बॉम्ब संशयित प्रबेश याने फेकले होते, असे पोलिसांनी सांगितले.

त्याने 16 जानेवारीच्या पहाटे पोलिस चौकीवर बॉम्ब फेकले. त्याने पोलिसांच्या चौकशीत त्याला संघ कार्यालयावर बॉम्ब फेकायचे होते, असे त्याने कबूल केले आहे. हा भाग राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाल्यास तो विरोधी पक्षाकडून झाल्याचे मनाण्यात येते. त्यातून तणाव निर्माण होतो, असे वरीष्ठ निरीक्षक निजेश म्हणाले.

काही महिन्यांपुर्वी येथे पोलिस चौकी स्थापन करण्यात आली आहे. मात्र तेथून पोलिस चौकी हटवून सामजिक अस्वस्थता निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असा आमचा संशय आहे. सीसीटीव्हीतील छायाचित्रांमुळे या घटनेच्या मुळाशी जाता आले. हल्ला केल्यानंतर तो कोईमतूर येथे जाऊन लपला होता, आमच्या पथकाने त्याला कोईमतूर येथून ताब्यात घेतले, असे त्यांनी सांगितले.

प्रबेशवर अनेक गुन्हे नोंद असून त्याच्या स्फोटके प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.

संघ कार्यालयाचे नाव कथिरूर मनोज असे एका कार्यकर्त्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याची 2014मध्ये कम्यनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती. कम्युनिस्ट नेते पी. जयराजन यांच्या 1999 मध्ये झालेल्या हत्येत तो आरोपी होता.

 

Leave a Comment