“सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी मोठ्या संख्येने मतदान करा”; जेपी नड्डा यांचे आवाहन

 Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज १ जून रोजी (शनिवार) मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहेअखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

यात पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व ४ जागांसाठी अखेरच्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तरप्रदेशातील १३, पश्‍चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, ओडिशातील ६ आणि झारखंडमधील ३ जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. त्याशिवाय, चंदिगढमधील एकमेव जागेसाठीही मतदान पार पडले जात आहे. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

यानंतर माध्यमांशी संवाद साधत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. “मी या बूथवरील पहिला मतदार होतो. मी सर्व मतदारांना सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. मी मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मतदान करावे आणि भारताला सक्षम बनविण्यात योगदान द्यावे. आत्मनिर्भर आणि विकसित भारत… मी याला लोकशाहीचा सण मानतो.” यावेळी जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. Lok Sabha Election 2024|

दरम्यान, हिमाचल प्रदेशात लोकसभेच्या चार जागांवरही आज मतदान पार पडत आहे.  येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. १ जून रोजी विधानसभेच्या ६  जागांवर पोटनिवडणुकीसाठी तसेच लोकसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे. हमीरपूर, कांगडा, मंडी आणि शिमला ही लोकसभा मतदार संघ आहेत.  Lok Sabha Election 2024|

हेही वाचा: 

सातव्या टप्प्यासाठी मतदान सुरू; वाराणसी-मंडीसह 57 जागांवर मतदान