मतदारांनी खोट्या आश्‍वासनांना बळी पडू नये – डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे – निवडणुकीमुळे सर्वच पक्ष जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील पक्षानी सिलेंडर, डिझेल, पेट्रोल स्वस्तात देण्याची घोषणा केली आहे. मात्र ज्यांनी सत्तेत असताना काहीच केले नाही आणि आता विरोधात असताना आश्‍वासने देत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या आश्‍वासनांना बळी पडू नका, असे आवाहन विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मतदारांना केले.

डॉ. गोर्‍हे यांनी पत्रकार परिषद घेवून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. विरोधकांनी सत्तेवर असताना दळणवळणाची साधणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आश्‍वासनांना काही अर्थ नाही. भाजपा घटना बदलेल, असाही आरोप केला जात आहे. हा आरोपही खोटा असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी स्पष्ट केले.

केंद्रातील मोदी सरकारने तसेच राज्यात युती महायुती सरकारने विकास कामे केली आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली नाही. महायुतीच्या नेत्यात चांगला समन्वय आहे. त्यामुळे प्रचाराला गती मिळत आहे. राज्यात सर्वत्र महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. या निवडणुकीत महिला संघटक वाढल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून महिलांचे राजकीय सक्षमीकरण होत असल्याचेही डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.