टेक्नीकल वीकमध्ये वाडियाच्या विद्यार्थ्यांचे यश

पुणे – पिंपरी चिंचवड तंञनिकेतन महाविद्यालयात झालेल्या “टेक्नीकल वीक 2020” या स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले. अणुविद्युत विभागाच्या श्रेया अंबेटी व जेसिंथा पोरुथुर यांनी तांञिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. क्षितिजा कायत आणि वेदिका पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईनमध्ये प्रथम पारितोषिक तर मयुर मोरे याने क्लिक पिक्चरमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांना विभागप्रमुख ए एस चांडक, प्राध्यापक शुभांगी वर्मा , ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य व्ही आर राव यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment