वाघोली: स्थलांतरित होणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी जागेची मागणी

वाघोली – वाघोली या ठिकाणाहून स्थलांतरित होणारे आरोग्य केंद्र केसनंद मध्ये उभारण्यात यावे या करीता किमान एक हेक्टर वनविभागाची जागा गावाकरीता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली आहे.

याबाबत सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले की,  घनकचरा प्रकल्प एसटीपी (सांडपाणी) प्लॅन्ट, व  विविध विकास कामाकरीता केसनंद गावाकरीता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दतात्रय हरगुडे, सचिन हरगुडे, विशाल हरगुडे, धनंजय हरगुडे, दशरथ गायकवाड, गणेश हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले असल्याचे सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले.