जोगेश्वरीमध्ये गोदामाला लागलेली आग आटोक्‍यात

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये गोदामाला लागलेली आग आता आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या इथे कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. गुरुवारी पहाटे अचानक गोदामाला भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.


जोगेश्वरीच्या राम मंदिर रोडवरील सोमानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या गोदामाला अचानक भीषण आग लागली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन, 6 पाण्याचे टॅंकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती.

आग भीषण असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीमध्ये कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Leave a Comment