वाॅर्नच्या कॅपची कोटींची उड्डाणे; ऑस्टोलियातील आगपीडितांना मदत

सिडनी : ऑस्टोलियातील  भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तसेच त्याची झळ पोहोचलेल्या पीडितांच्या मदतीसाठी महान गोलंदाज शेन वाॅर्न याने केलेली मदत संपूर्ण क्रीडाक्षेत्रासाठी डोळ्यात अंजन घालणारी ठरली. वाॅर्नच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव आज या पिडीतांच्या मदतनिधीसाठी झाला त्यात जवळपास ५ कोटी रूपयांची उभारणी झाली.

वाॅर्नच्या कॅपला १० लाख ७ हजार ५०० आॅस्ट्रेलियन डाॅलर्स इतकी बोली लागली. भारतीय चलनात ही किंमत जवळपास ५ कोटी रूपये इतकी होते.

ऑस्टोलियातील जंगलात काही दिवसांपासून भीषण आग लागली आहे. या आगीवर अद्यापही पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. वनसंपदेचेही प्रंचड नुकसान झाले असून अनेक नागरिकांनाही स्थलांतर करावे लागले आहे. त्यांच्या मदतनिधीसाठी वाॅर्नने आपल्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव केला. त्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवरून वाॅर्नने या मदतनिधीसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार देखील मानले आहे.

 

Leave a Comment