‘मुख्यमंत्री कोण होणार, हे शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं’ पहा व्हिडिओ

मुंबई –  शिवसेनेचा ठाकरे गट जनतेच्या मनातील प्रश्न समजून घेण्यासाठी  युट्यूब चॅनलवर या पॉडकास्टचे लवकरच प्रसारण  केलं  आहे. आवाज कुणाचा या नव्या पॉडकास्टच्या प्रसारणामध्ये  नितीन देशमुख बोलत होते.  यावेळी  नितीन देशमुख यांनी मोठा  गौप्यस्फोट केला आहे.

नितीन राऊत म्हणाले,’एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. पण, सरकार पाडायचं एवढेच देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं,” असं  देशमुख यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. हे सपशेल चुकीचं आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं,” असं म्हणत नितीन देशमुख यांनी सत्तांतराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.