IND vs WI 2nd Test Live: वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात 1 बदल, जाणून घ्या..दोन्ही संघाची प्लेइंग-11

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यास पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरूवात झाली आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (TOSS) वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटने नाणेफेक (TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, जर मी Toss जिंकला असता तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. अशा परिस्थितीत Toss हरल्यानंतरही तो आनंदी आहे.

विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहितने सांगितले की, शार्दुल अनफिट असल्याने त्याच्याजागी
मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 पुढीलप्रमाणे :-

भारत: यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज।

वेस्ट इंडिज: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानेज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शॅनन गॅब्रिएल.

दरम्यान, डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि 141 धावांनी जिंकली होती. तसेच 2016 पासून उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांची ही चौथी मालिका असून यामध्ये आठपैकी सात कसोटी सामने भारताने जिंकले आहेत.