WI vs SA 3rd T20I : विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिजचा धमाका, टी-20 मालिकेत आफ्रिकेला 3-0 ने दिला व्हाईटवॉश…

West Indies Vs South Africa T20I Series : वेस्ट इंडिजला 5024 च्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिज 2 जून रोजी पापुआ न्यू गिनीसोबत आपला सलामीचा सामना खेळणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन संघांमध्ये (WI vs SA) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेत आफ्रिकेचा 3-0 असा धुव्वा उडवून वेस्ट इंडिजने दाखवून दिले आहे की, टी-20 विश्वचषकात त्यांना हलक्यात घेतले जाऊ शकत नाही.

सोमवारी (27 मे) खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने आफ्रिकन संघाचा 8 गडी राखून पराभव करत ही कामगिरी केली.  प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने केवळ 13.5 षटकांत 2 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

वेस्ट इंडिजने पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव केला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या टी-20मध्ये 16 धावांनी पराभूत झाला. त्याचवेळी, आता वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने दक्षिण आफ्रिकेचा सूपडा साफ केला आहे. गेल्या टी-20 विश्वचषकापासून दक्षिण आफ्रिकेने 11 टी-20 सामन्यापैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, ही या संघासाठी धोक्याची घंटा आहे. या काळात दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा वेस्ट इंडिज आणि एकदा ऑस्ट्रेलियाकडून टी-20 मालिका गमावली आहे.

तिसऱ्या टी20 बद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार व्हॅन दुर डसेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 163 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार व्हॅन डर ड्युसेनने 31 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. वियान मुल्डरने 28 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. पण याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. वेस्ट इंडिजकडून ऑबेड मॅकॉयने सर्वाधिक 3 बळी घेतले. शेमर जोसेफ आणि गुडाकेश मोती यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.

IPL 2024 : करोडों कमावले पण केलं तर काहीच नाही, मॅक्सवेलसह ‘या’ तीन खेळाडूंनी आपल्या संघांला लावला चूना…

दक्षिण आफ्रिकेच्या 163 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली. वेस्ट इंडिजचे सलामीवीर ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी पहिल्या विकेटसाठी 6.4 षटकांत 92 धावा जोडल्या. ब्रँडन किंग 28 चेंडूत 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर जॉन्सन चार्ल्सने 26 चेंडूत 69 धावांचे योगदान दिले. कायली मेयर्स 23 चेंडूत 36 धावा करून नाबाद परतला. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेने केवळ 13.5 षटकांत 2 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.