२४ अंशांवर एसी चालवण्याचे फायदे काय आहेत? सोप्या शब्दात जाणून घ्या

उन्हाळा येताच लोक खूप अस्वस्थ होतात, कारण कडक उन्हामुळे लोकांना घाम फुटतो, अस्वस्थता वाढते आणि त्यांना काही नीट करता येत नाही. यंदा तर उन्हाळ्याने कहर केला असून दररोज तापमान ४० च्या पुढे दिसत असून सध्याही अशीच परिस्थिती आहे. उन्हाळा जोरात सुरू आहे आणि लोक ते टाळण्याचे मार्ग शोधत आहेत. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक सहसा घरांमध्ये एसी लावण्याला प्राधान्य देतात. जेणेकरून त्यांना उन्हाच्या झळांपासून मुक्ती मिळेल. घरी येताच एसी चालू केल्यास थोड्याच वेळात खोली थंड होते. मात्र, एसी चालवल्यास वीज बिल नक्कीच जास्त येते. साधारणपणे लोक एसी चालू करताच त्याचे तापमान १६ किंवा १८ अंश ठेवतात. मात्र २४ अंशांवर एसी चालवणे खूप फायद्याचे ठरते. का? तर जाणून घेऊया.

वास्तविक, वीज मंत्रालयाने एसीचे डिफॉल्ट तापमान २४ अंशांवर ठेवण्याची सूचना केली होती. त्यांनी यामागचे कारण सांगितले की, असे केल्याने विजेच्या वापरात बचत होईलच, सोबतच एका वर्षात घराचे वीज बिल ४ हजार रुपयांनी कमी होईल.

एसी २४ अंशांवर ठेवण्याचे ‘हे’ फायदे

. वीज बचत
जर तुम्ही २४ डिग्रीवर एसी चालवलात तर तुमचे वीज बिल कमी होते. दुसरीकडे, जर तुम्ही १८ किंवा १६ अंशांवर एसी चालवला तर तुमचे वीज बिल खूप जास्त येते. त्यामुळे २४ अंश तापमानातच एसी चालवणे फायदेशीर ठरते.

. कॉम्प्रेसरवर कमी प्रभाव
जर तुम्ही १८ अंशांवर एसी चालवत असाल तर यामुळे कॉम्प्रेसर सतत चालू राहून खोलीचे तापमान ४० अंशांनी कमी होईल. जर तुम्ही ते २४ अंशांवर चालवले तर खोलीचे तापमान २४ अंशांवर पोहोचताच एसीचा कॉम्प्रेसर चालू होणे बंद होईल आणि मग तो फक्त पंखा असेल. त्याच वेळी, जेव्हा तापमान वाढते, तेव्हा कॉम्प्रेसर पुन्हा चालू होईल. याचा कॉम्प्रेसरवर कमी परिणाम होतो.

. कॉम्प्रेसरचे आयुष्य वाढते
अशा परिस्थितीत, जेव्हा कॉम्प्रेसर कमी वापरला जातो, तेव्हा साहजिकच कॉम्प्रेसरचे आयुष्य सुधारते. वॉरंटीनंतर कॉम्प्रेसर खराब झाला तर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे २४ डिग्री तापमानात एसी चालवून तुम्ही कॉम्प्रेसरचे संरक्षणही करू शकता आणि त्याचे आयुष्य अधिक काळ टिकू शकते.