काय सांगता..! शनिवारच्या दिवशी ‘हे’ खास उपाय केल्याने शनिदेव होतील प्रसन्न…

पुणे – आज शनिवार… हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शनिदेवाची मनोभावे पूजा केली जाते. शनिदेवांना कर्म फळ देणारे म्हटले जाते. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ आणि पुरस्कार देतो.

मात्र, हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय संपूर्णतः भगवान शनिदेव घेतो. कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहूशकत नाही. यामुळेच शनिदेवाची कृपा राहावी यासाठी दर शनिवारी भगवान शनिची मनोभावे पूजा करतात.

असे म्हंटले जाते कि शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले तर रस्त्यावरील भिकारी व्यक्ती सुद्धा राजा बनतो. जर तुम्हाला देखील शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल आणि तुमच्या आयुष्यतील साडेसाती दूर करायची असेल तर खाली दिलेले काही सोपे उपाय नक्की करून बघा….

१) जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर शनिवारी रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात पाच लाल फुले आणि पाच दिवे सोडा, यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होतील.

२) कोणत्याही गरजूंना मदत करा आणि वडीलधाऱ्यांची सेवा करा. ते लोक शनिदेवाला खूप प्रिय आहेत जे त्यांच्या वडीलधाऱ्यांचा आदर करतात आणि गरजूंना मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

३) शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्‍तू बांधावी. त्‍याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे.

त्‍यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्‍यक्तिस काळे वस्त्र आणि त्‍यात गुंडाळलेल्‍या वस्‍तू दान कराव्‍यात. प्रत्येक शनिवारी केल्‍यास काही दिवसातच त्‍याचे सकारात्‍मक फळ मिळण्‍यास प्रारंभ होईल.

४) मोहरीच्या तेलात केलेला कोणताही पदार्थ या दिवशी मुक्या जनावराला खायला द्या. असं केल्याने तुम्हाला याचा मोठा लाभ आणि मानला शांती मिळेल.