काय सांगता… दोन वर्षांत खरंच इंटरनेट संपणार? जाणून घ्या, यामागचे कारण आणि का झाली जगभरात चर्चेला सुरुवात…

मुंबई – इंटरनेट ही सध्या लोकांची गरज बनली आहे. लोक बहुतेक कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. यामुळे जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या भारतात 800 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत.

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की इंटरनेट कधी संपेलही ? सन 2025 मध्ये सौर वादळामुळे इंटरनेट संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वास्तविक, 2025 साली सूर्य आपल्या सौरचक्राच्या शिखरावर पोहोचेल.

यावेळी, एक विनाशकारी सौर वादळ पृथ्वीवर आदळू शकते, ज्यामुळे इंटरनेटचे नुकसान होऊ शकते. आजकाल सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत आहे आणि यासाठी लोक ‘इंटरनेट एपोकॅलिप्स’ सारखे शब्द वापरत आहेत.

जाणून घेऊया अखेर काय आहे हे प्रकरण?

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा सतत या अफवांची माहिती देत आहे. सूर्याचे सौरचक्र नवीन नाही. सन 1755 पासून, सूर्याच्या चक्राची नोंद ठेवली जात आहे आणि तेव्हापासून ते 25 वेळा घडले आहे. परंतु तज्ञ चिंतेत आहेत, कारण सध्याचे चक्र सामान्यपेक्षा खूपच वेगवान आहे. अंदाजापेक्षा जास्त सनस्पॉट्स आणि उद्रेक झाले आहेत.

2025 मध्ये सौर वादळामुळे इंटरनेट संपुष्टात येण्याच्या शक्यतेवर नासाकडून कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. पण मग हा वाद अचानक का सुरू झाला? का हे फक्त काल्पनिक आहे ? वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही शक्यता पूर्णपणे काल्पनिक नाही. पृथ्वीवरील सौर वादळामुळे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

* सौर वादळामुळे काय नुकसान होईल?

सौर वादळांमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स असतात जे मोठे असताना पृथ्वीवर विनाशकारी परिणाम करू शकतात. US National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) चे प्रवक्ते म्हणतात की अवकाशातील हवामान वादळांची वारंवारता निश्चित करण्यासाठी सूर्याच्या सौरचक्राचे निरीक्षण केले जाते.

त्यांचे म्हणणे आहे की सौर चक्रांचे निरीक्षण करणे आणि अंदाज लावणे हे सर्व प्रकारच्या अवकाशातील हवामान वादळांच्या वारंवारतेची कल्पना देते. सौर वादळांमुळे रेडिओ ब्लॅकआउट किंवा पॉवर ग्रीड बिघाड होऊ शकतो.