‘आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने ‘त्या’ फोटोमागील सत्य केले उघड

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ (Aai kuthe kay karte?) मालिकेतील सर्व पात्र लोकप्रिय आहेत. या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) या मालिकेचा निरोप घेतला आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिने इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर गौरी कुलकर्णीचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता गौरीने या फोटोमागचे गुपित उघड करत सत्य सांगितले आहे.

गौरी कुलकर्णीने काही दिवसांपूर्वी इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने हात दाखवत पोझ दिली होती. तिच्या हातात असलेली अंगठी पाहून चाहत्यांनी तिचा साखरपुडा झाला असा अंदाज लावला होता. त्यानंतर आता तिने एक पोस्ट करत फोटोचा खरा अर्थ सांगितला आहे. गौरीचा साखरपुडा झालेला नसून तो फोटो तिच्या नव्या बिजनेसची जाहिरात करण्यासाठी असल्याचे तिने सांगितले आहे. गौरीने स्वतःचा नेल आर्टचा ब्रँड सुरू केला आहे. तिच्या प्रेस ऑन नेल ब्रँड चं नाव ‘नखरेल नेल्स’ असे आहे. ज्यासाठी तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri🐾 (@gaurikulkarni23)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri🐾 (@gaurikulkarni23)

याबद्दल गौरीने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हो मी एन्गेज आहे, एका खास गोष्टीशी. मी माझ्या नव्या ब्रँडशी एन्गेज आहे. ‘नखरेल नेल्स’. गौरी कुलकर्णीचा प्रेस ऑन नेल ब्रँड ‘नखरेल नेल्स’ मी माझ्या या बाळाची खूप दिवसांपासून प्लॅनिंग करत होते आणि आता ते तुमच्यासाठी तुमच्या समोर आहे. मी जेव्हा खरंच साखरपुडा करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेन.’ गौरीच्या या नव्या निर्णयावर सगळ्यांनी तिचं कौतुक करत तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही तिच्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.