पार्किन्सन रोग काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत… जाणून घ्या या मेंदूच्या विकाराबद्दल

पार्किन्सन डिसीज हा न्यूरोलॉजिक आजार आहे. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन निर्माण करणाऱ्या पेशी योग्यरीत्या कार्य करण्याचे थांबल्यास किंवा काळानुरूप त्यांच्या प्रमाणामध्ये घट झाल्यास हा आजार विकसित होतो. या पेशी लेखन, चालणे, बोलणे अशा हालचालींवर नियंत्रण ठेवतात. या पेशींची संख्या कमी होऊ लागल्यास या आजाराची लक्षणे दिसू लागतात. कित्येक दशके अनेकांच्या जीवनावर या आजाराचा घातक परिणाम झाला आहे. काळानुरूप पार्किन्सनची लक्षणे वाढत जातात आणि रुग्णांना त्यानवर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड बनते. वैद्यकीय उपचारासह प्रगत डीबीएस तंत्रज्ञानचा (DBS – Deep brain stimulation)अवलंब केल्यास रुग्णांना उत्तम जीवन जगण्यामध्ये मदत होऊ शकते.

डीबीएस सिस्टिम्स रिचार्जेबल बॅटऱ्यांसह येतात. या बॅटऱ्या डिवाईसला 24 तासांपर्यंत कार्यरत ठेवतात. महत्त्वाचे म्हणजे डिव्हाईस तुमच्यावर देखरेख ठेवते आणि प्रत्येक वेळी तुमच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवते. पार्किन्सन आजाराने पीडित रुग्णांसाठी अचूक उपचारासह अनुकूल थेरपी देण्याकरिता आधुनिक डीबीएस सिस्टिम्स तयार करण्यात आल्या आहेत.

नवीन तंत्रज्ञानांमध्यें प्रोग्रामिंग लवचिकता, विविध फ्रीक्वेन्सीकज आणि कमी पल्स विड्‌थ्स असतात. हे तंत्रज्ञान रुग्णांना त्यांच्या आजाराच्या काळात उत्तम उपचार देतात. या सिस्टिम्समध्ये असलेल्या रिचार्जेबल बॅटऱ्या 25 वर्षांपर्यंत टिकू शकतात. दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि अचूक स्टिम्युलेशन हे रिचार्जेबल बॅटऱ्यांचे लाभ फक्त प्रगत डीबीएस तंत्रज्ञानामुळेच शक्‍य आहेत. बॅटरीच्या दीर्घकाळ टिकाऊपणामुळे शस्त्रक्रिया आणि रिप्लेसमेंट प्रक्रियांशी संबंधित असलेले धोके कमी होण्यामध्ये मदत होते.

शस्त्रक्रियेनंतर देखील रुग्णाला पार्किन्सन आजारासह राहावे लागते. पण त्यावर नियंत्रण ठेवता येते. तुमच्याकडे असे डिवाईस आहे, जे कंपन मेंदूपर्यंत जाण्याआधी नियंत्रित करते. पीडीसाठीचा उपचार दीर्घकाळापासून होत आहे. तज्ज्ञां ना फक्त पॅलिडोटोमी व थॅलॅमोटोमी या उपचार पद्धतींवर अवलंबून राहावे लागत होते. या उपचार पद्धतींमध्ये मेंदूमधील पेशींमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पेशींवरच फोकस केले जाऊन त्यांना नष्ट केले जाते आणि या पेशी पुन्हा बनू शकत नव्हत्या. दुसरीकडे डीबीएसमध्ये हे करता येऊ शकते. रुग्णाला आराम मिळत नसेल तर स्टिम्युलेशन बंद केले जाते आणि मेंदूवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. पॅलिडोटोमी किंवा थॅलॅमाटोमीच्या बाबतीत असे नाही.

डीबीएस सारखे प्रगत उपाय आजारी रुग्णांचच्या हालचालीसाठी रोजच्या उपचार पद्धतींमध्ये लक्षणीय सुधारणा करत आहेत आणि फक्त औषधोपचारावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करत आहेत. रुग्णांमध्ये अशा उपचार पद्धतींबद्दल जागरुकता निर्माण करण्याची वेळ आली आहे.