सोशल मीडियावर चर्चेत आलेले ‘Click here’ ट्रेंड काय आहे? येथे क्लिक करून जाणून घ्या माहिती

ClickHere Trend| सोशल मीडियावर सातत्याने विविध प्रकारचे ट्रेंड व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. सध्या असाच एक वेगळा ट्रेंड एक्सवर चर्चेत आला आहे. हे चॅलेंज #ClickHere नावाने ओळखलं जात आहे. या पोस्टवर हजारो लोक सहभागी होत आहेत.

पोस्टमध्ये, लोक पांढऱ्या रंगाच्या चित्रावर काळ्या रंगात ‘ClickHere’ लिहून फोटो शेअर करत आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकजण नाराज झाले आहेत, तर अनेकजण याला मजेदार म्हणत आहेत. अनेक वापरकर्ते हा ट्रेंड काय आहे हे समजू शकत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया “ClickHere” पोस्ट चा अर्थ काय आहे?

काय आहे  #ClickHere ट्रेंड? 

टि्वटरवर #ClickHere पोस्टच्या माध्यमातून शेअर होत असलेल्या चित्रावर बाणासारखे चिन्ह आहे. हा बाण खालील दिशेला असून तिथे एक छोटासा ‘Alt Text’ लिहिलेला दिसतो. ‘Alt’ वर क्लिक करताच तुम्हाला एक संदेश दिसेल. जर कोणत्याही X वापरकर्त्याने त्या पोस्टच्या ‘Alt’ वर क्लिक केले नाही तर त्यांना कोणताही संदेश दिसणार नाही. यामध्ये तुम्ही तुमचं मत 420 शब्दांपर्यंत व्यक्त करू शकता. X ने हे फीचर 2016 मध्ये सादर करण्यात आले होते.

या मध्ये जेव्हा तुम्ही फोटो अपलोड कराल तेव्हा बाजूला Alt लिहिले दिसते. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्रतिमेचं वर्णन लिहिलं जाईल. यामध्ये तुम्ही हवं ते लिहू शकता. जेव्हा इतर कोणी तुमच्या Alt वर क्लिक करेल, तेव्हा तुम्ही जे लिहिले आहे तो मजकूर दिसेल. हे फिचर Text-To-Cpeech ओळख आणि ब्रेल भाषेच्या मदतीने फोटो समजून घेण्यास दृष्टिहीनांना मदत करू शकते.

विशेष म्हणजे राजकीय नेत्यापासून प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला या चॅलेंजचं वेड लागलं आहे. भाजप पक्षाने आपल्या पोस्टच्या Alt मजकूर विभागात हिंदीमध्ये लिहिले, ‘पुन्हा एकदा मोदी सरकार.’या दरम्यान आम आदमी पार्टीनेही या ट्रेंडचा फायदा घेतला आणि 31 मार्च रोजी होणाऱ्या मेगा रॅलीचा संदेश दिला.

Alt मजकूर कसा वापरायचा?

  • तुम्ही X वर चित्र पोस्ट केल्यास, तुम्हाला ALT पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करताच तुम्हाला मेसेज लिहिण्याचा पर्याय दिसेल.
  • तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही या बॉक्समध्ये लिहू शकता.
  • संदेश फोटोमध्ये जोडला जाईल.
  • जर एखाद्याला त्या पोस्टचे संदेश वाचायचे असतील तर त्याला ALT वर क्लिक करावे लागेल.

हेही वाचा: 

नवीन आर्थिक वर्षात दिलासा; एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त; जाणून घ्या नवे दर