राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि त्यांची भूमिका काय ? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. त्याच प्रश्नाचे उत्तर आज पण जाणून घेऊ.

दरम्यान, देशाच्या संविधानात पंतप्रधानांनंतर कॅबिनेट मंत्रीपद आणि त्यानंतर स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपद येते. तर राज्यमंत्री तिसऱ्या क्रमांकावर येते. या दोन्ही मंत्र्यांची कामं पूर्णपणे वेगळे असते.

राज्यमंत्र्यांची भूमिका काय? PM Modi cabinet ।
राज्यमंत्री हा कॅबिनेट मंत्र्याचा सहकारी असतो. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि कॅबिनेट मंत्री गैरहजर असल्यास ते त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रालयाचे सर्व काम पाहतात. दरम्यान, राज्यमंत्री पंतप्रधानांना नाही तर केवळ कॅबिनेट मंत्र्याला अहवाल देतात.

स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री किती ताकदवान ?
स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री पद हे राज्यमंत्रिपदापेक्षा जास्त आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री थेट पंतप्रधानांना अहवाल देतात आणि त्यांच्याकडे मंत्रालयाची संपूर्ण जबाबदारी असते. स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री त्यांच्या विभागाच्या कॅबिनेट मंत्र्याला उत्तरदायी नसतात. मात्र, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. मात्र गरज भासल्यास त्यांनाही बैठकीसाठी बोलावता येईल.

पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळ कसे आहे? PM Modi cabinet ।
पीएम मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात सातत्य आणि सावधगिरीचे संकेत आहेत. परिस्थिती राजकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि त्यावर आपले नियंत्रण आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आपले अनेक जुने आणि अनुभवी मित्रपक्ष कायम ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांनी गीअर्स बदलल्याचे दिसते. हे सरकार मोदी किंवा भाजप सरकार नसून एनडीएचे सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीपासून एनडीएला प्राधान्य देण्यात आले.