कशासोबत काय खाऊ नये…?

पुणे – आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

– दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.
– दह्यासोबत खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा आणि गूळ इत्यादी घेऊ नये.
– तुपासोबत थंड दूध, थंड पाणी समप्रमाणात हानिकारक असते.
– मधासोबत मुळा, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
– फणस खाल्यानंतर पान खाणे हानिकारक असते.
– मुळ्यासोबत गूळ खाणे नुकसानदायक असते.
– खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
– गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये
– थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये.
– कलिंगडाबरोबर पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
– चहासोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
– माशासोबत दूध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
– मांसाहाराबरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
– गरम जेवणाबरोबर थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.
– खरबुजाबरोबर लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.

भाग्यश्री नाईक

Leave a Comment