RBIने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केल्यानंतर काय होणार बदल? जाणून घ्या…

RBI action against Kotak Mahindra Bank|  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. खासगी बँकांना ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तर  कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवावे, असे RBI ने निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून आज कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला तात्काळ प्रभावाने कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये नवीन ग्राहकांना त्याच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे ऑनबोर्ड करणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे समाविष्ट आहे. मात्र बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवणार आहे.

दोन वर्षे सतत देखरेख केल्यानंतर निर्णय RBI action against Kotak Mahindra Bank|  

2022 आणि 2023 च्या सलग दोन वर्षांच्या देखरेखीनंतर आरबीआयचा निर्णय आला आहे. या कालावधीत, आरबीआयला बँकेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कमतरता आढळली. सर्वसमावेशक आणि वेळेवर या समस्यांचे निराकरण करण्यात बँक अपयशी ठरली. RBI ने IT इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, पॅच आणि चेंज मॅनेजमेंट, यूजर ऍक्सेस मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीकेज प्रतिबंधक स्ट्रॅटेजीज, बिझनेस कंटिन्युटी आणि डिझास्टर रिकव्हरी कठोरता आणि ड्रिल्स यांसारख्या क्षेत्रातील गंभीर कमतरता दिसून अल्या.

केंद्रीय बँकेने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती शेअर केली असून बँकेतील अनेक त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  2022 आणि 2023 वर्षांसाठी बँकेच्या आयटी ऑडिटमधून उद्भवलेल्या महत्त्वपूर्ण चिंतेवर आणि वेळेवर आणि योग्य रीतीने या समस्यांचे निराकरण करण्यात बँकेचे सतत अपयश आल्याने यावर आधारित या कृती आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: 

YouTuber मनीष कश्यप आज भाजपमध्ये प्रवेश करणार ; निवडणूक लढवणार नाही, पण…