#T20WorldCup | टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणारी राजलक्ष्मी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? जाणून घ्या…

Rajalakshmi Arora – टीम इंडियाच्या १५ सदस्यांचा संघ ऑस्ट्रेलियात काही दिवसांपूर्वी पोहोचला असून सध्या संघ सराव सामने खेळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघासोबत १६ सदस्यांचा स्टाफही ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफही सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे. संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेल्या प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भूमिका सोपवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या १६ सदस्यीय स्टाफमध्ये एक महिलाही भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे.

भारतीय संघाच्या स्टाफमध्ये समाविष्ट असलेल्या या महिला स्टाफचे नाव राजलक्ष्मी अरोरा ( Rajalakshmi Arora ) असे आहे. राजलक्ष्मी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघासोबत देश-विदेश दौऱ्यावर जात आहे. आता तुमहाला प्रश्न पडला असेल की, ती नेमकं संघासोबत का जाते आणि काय काम करते? तर राजलक्ष्मी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळात म्हणजे बीसीसीआय ( BCCI )ची वरिष्ठ मीडिया प्रोड्यूसर आहे.

#INDvsAUS | मोहम्मद शमीची ‘ती’ एक ओव्हर अन कांगारूंचा खेळ खल्लास, पाहा व्हिडिओ

राजलक्ष्मी अरोरा भारतीय संघातील खेळाडू, बोर्ड अधिकारी आणि चाहते यांच्यातील चांगले संबंध जपण्याचे काम करते. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पत्रकार परिषदांद्वारे चाहते आणि भारतीय संघातील चांगले संबंध जोपासण्याची जबाबदारी राजलक्ष्मीकडे आहे.

राजलक्ष्मीने तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली होती. यानंतर ती २०१५ साली बीसीसीआयमध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणून रुजू झाली. त्यानंतर आता सध्या राजलक्ष्मी बीसीसीआयमध्ये वरिष्ठ मीडिया प्रोड्यूसर पदावर कार्यरत आहे. राजलक्ष्मीचे शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधून झालेले आहे. येथूनच तिने माध्यम विषयात पदवी प्राप्त केलेली आहे.

त्याचबरोबर २०१९ मध्ये राजलक्ष्मीची बीसीसीआयच्या चार सदस्यीय अंतर्गत समितीच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ती बीसीसीआयशी जोडली गेलेली आहे. राजलक्ष्मीने यापूर्वी बोर्डाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुख म्हणूनही काम केलेले आहे.

यादरम्यान तिच्याकडे भारतीय खेळाडूंमधील गैरवर्तन आणि भारतीय खेळाडूंच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याची जबादारी होती. यानंतर आता राजलक्ष्मी वरिष्ठ मीडिया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. याशिवाय तिने आयपीएलच्या अनेक हंगामांमध्ये मीडिया मॅनेजर म्हणूनही काम केले आहे.