जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

 BJP National President| नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर काल नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला आहे. नितीन गडकरी, अमित शाह, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, निर्मला सितारमण यासारख्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना यावेळी मंत्रिपद मिळाले आहे. यानंतर आता भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण झाला आणि त्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यातच आता जे. पी. नड्डा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे आता नड्डा यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र त्यांनीही मंत्रीपद मिळाले आहे.  . BJP National President|

विनोद तावडेंचे नाव चर्चेत  

यात आता माजी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना संधी मिळू शकते. यासोबतच या पदासाठी सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे असून राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभेचे तिकीट तावडे यांना मिळाले  नव्हते. त्यावरून त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी मोदी अमित शाह यांचा विश्वास संपादन केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी बनले.

याशिवाय उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश शर्मा यांचेही नाव चर्चेत आहे. शर्मा हे राज्यसभेचे खासदार असून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. BJP National President|

तसेच सुनील बन्सल हे ओडिशा, बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अल्पावधीतच भाजप हायकमांडचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे या पदासाठी बन्सल यांचे नाव देखील चर्चेत आहे.

हेही वाचा : 

पंतप्रधानपदावर विराजमान होताच मोदींची देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट; पहिल्याच दिवशी ‘या’ फाईलवर स्वाक्षरी