भारतीय विद्यार्थी दरवर्षी MBBS करण्यासाठी युक्रेनमध्ये का जातात? ‘कमी फी’ बरोबरच इतरही कारणे जाणून घ्या !

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान, १३५ कोटी देशवासियांना सर्वात जास्त त्रास देणारी एकमेव चिंता म्हणजे युद्धक्षेत्रातून भारतीय विद्यार्थ्यांचे सुरक्षित परत येणे. कुटुंबातील सदस्यांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वजण दिवसभर या प्रयत्नात गुंतलेले आहेत की, कोणत्याही मार्गाने तमाम भारतीय विद्यार्थ्यांना तणावग्रस्त भागातून बाहेर काढले पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय तातडीच्या बैठकीनंतर भारत सरकार आपल्या काही मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पाठवत आहे, जेणेकरून तेथून विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षित परत येण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

ऑपरेशन गंगा एअरलिफ्ट मोहीम
सुमारे १८,०९५ भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. यापैकी काही स्वत: भारतात परतले आहेत, एअर इंडियाच्या मदतीने ऑपरेशन गंगा अंतर्गत सुमारे २००० विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. अजूनही सुमारे १३ हजार विद्यार्थी आणि नागरिकांना तेथून बाहेर काढावे लागले आहे. त्यांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

* बहुतांश विद्यार्थी हे मेडिकलचे विद्यार्थी
युक्रेनमध्ये अडकलेले बहुतांश भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय विद्यार्थी आहेत. म्हणजेच जे विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युक्रेनला गेले होते. पण हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे की दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी का जातात? यामागे स्वस्त शिक्षण या प्रमुख कारणाबरोबरच इतरही अनेक कारणे आहेत. चला तर, जाणून घेऊया.

१. युक्रेनमध्ये परवडणारे वैद्यकीय शिक्षण
युक्रेनमध्ये मेडिकलचा अभ्यास करणे किफायतशीर तसेच अनेक मार्गांनी अधिक सोयीचे आहे. तर भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय शिक्षणाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी एमबीबीएस आणि बीडीएसचा अभ्यास करण्यासाठी युक्रेनसारख्या देशांमध्ये पोहोचतात.

२. शिक्षणाचा खर्च भारताच्या तुलनेत निम्मा
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च भारतातील खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. जिथे भारतातील सरकारी महाविद्यालयांमध्ये वार्षिक वैद्यकीय अभ्यासासाठी सुमारे २.५ ते ३ लाख रुपये खर्च येतो. तर खाजगी संस्थांमध्ये हे शुल्क दरवर्षी १० लाख ते १५ लाखांच्या आसपास येते. म्हणजेच, भारतातील खाजगी महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाच वर्षांचा खर्च सुमारे ७५ लाख ते ८० लाख रुपयांपर्यंत आहे. कॉलेज नावाजलेले असेल तर हा खर्च एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो. त्याच वेळी, युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासाचे शुल्क वार्षिक दोन ते चार लाख रुपयांच्या दरम्यान आहे. म्हणजेच पाच वर्षांच्या पूर्ण शिक्षणासाठी सुमारे २५ लाख ते ३० लाख रुपये खर्च येतो.

३. भारतात उमेदवारांच्या तुलनेत जागांची कमतरता
अर्जदार उमेदवारांच्या तुलनेत भारतातील जागांची संख्या खूपच कमी आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी भारतातील लाखो विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) सहभागी होतात. त्या तुलनेत सरकारी महाविद्यालयांमध्ये केवळ १० % उमेदवारांनाच प्रवेश मिळतो. कारण, भारतात एमबीबीएसच्या फक्त ८८ हजार जागा आहेत. त्याचवेळी बीडीएसच्या केवळ २७ हजार ४९८ जागा आहेत. २०२१ मध्ये सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. यावरून यातील सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

४. स्वतंत्र प्रवेश परीक्षा आवश्यक नाही
याशिवाय, युक्रेनमधून एमबीबीएस किंवा बीडीएसचा अभ्यास करण्यासाठी, एनईईटी किंवा डोनेशन इत्यादीसारख्या वेगळ्या प्रवेश परीक्षा नाहीत. येथे वर्षातून दोनदा सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. इथे भारताची NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश मिळतो, NEET च्या रँकला काही फरक पडत नाही. त्यामुळे, जे विद्यार्थी भारतात प्रवेश घेऊ शकत नाहीत, ते बहुतेक युक्रेनमधील संस्थांमध्ये प्रवेश घेतात. फक्त अभ्यास पूर्ण केल्यानंतर, एखाद्याला भारतात सराव करण्यासाठी FMCG परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

५. युक्रेनियन वैद्यकीय पदवी जागतिक स्वीकृती
युक्रेनमधून वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा एक फायदा म्हणजे येथील पदवी जागतिक स्तरावर स्वीकारली जाते. जागतिक आरोग्य परिषद, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि युरोपियन मेडिकल कौन्सिल यांनी याला मान्यता दिली आहे. यामुळे येथे शिकणारे वैद्यकीय विद्यार्थी अमेरिका, ब्रिटन, युरोपसह अनेक मोठ्या देशांमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. त्यामुळे बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांची परदेशात युक्रेनला पहिली पसंती मिळत आहे.

६. युक्रेनची आरोग्य पायाभूत सुविधाही मजबूत
युक्रेनमध्ये तांत्रिकदृष्ट्या समृद्ध, कमी लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे मजबूत आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा आहेत. येथे युक्रेन आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत अनेक मोठ्या देशांशी स्पर्धा करते. भारताप्रमाणेच येथील विद्यार्थ्यांनाही सरावाचा चांगला अनुभव मिळतो. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी युक्रेनला प्राधान्य देतात.

७. चार हजारांपैकी फक्त ७०० विद्यार्थी FMGE उत्तीर्ण होऊ शकतात
परदेशातून परतलेले सुमारे ४००० विद्यार्थी देशात वैद्यकशास्त्राचा सराव करण्यासाठी FMGE म्हणजेच विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा देतात. यामध्ये जेमतेम ७०० एमबीबीएस विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून दरवर्षी FMGE चे आयोजन केले जाते. पण तरीही विद्यार्थी युक्रेनमधून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची आशा सोडत नाहीत. युक्रेनमध्ये सुमारे १६ वैद्यकीय विद्यापीठे आहेत जी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.