कांद्याने रडवल.. लसनाने होतेय आग-आग ! किलोमागे मोजावे लागताहेत 400 पेक्षाही जास्त रुपये.. का वाढताहेत भाव ?

Garlic prices Increasing : सध्या नव्या लसणाचे पीक बाजारात आले आहे. साधारणपणे नवीन पीक बाजारात आल्यानंतर भाव कमी होतात. मात्र यावेळी लसणाच्या दरात घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रंगाने किंचित स्पष्ट आणि आकाराने मोठा असल्यास तो बाजारातच 480 रुपये किलो दराने विकला जात आहे. सरासरी आकाराचा लसूणही सध्या 100 रुपये प्रति पाव दराने विकला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती कांद्याच्या बाबत घडली होती आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं होत. मात्र सध्याच्या लसणाचे दर पाहता आग-आग (जळजळ) होईल अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे पाहायला मिळते.लसणाचे हे दर नेमके का वाढत आहेत ? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

कमी पेरणी
दरवर्षी हिवाळ्यात लसूण महाग होतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल. कारण हिवाळ्यात लसणाची मागणी वाढते.गेल्या वर्षीचा हिवाळा आठवा तेव्हा किरकोळमध्ये लसूण २० ते ३० रुपये किलोने विकला जात होता. त्यानंतर तर शेतकऱ्यांना पाच ते आठ रुपये किलो भाव मिळाला. त्यामुळे यावेळी लसूण पिकाखालील क्षेत्र घटले. त्याऐवजी शेतकऱ्यांनी इतर काही पिकांची पेरणी केली.परिणामतः उन्हाळा सुरु व्हायला आला तरी लसणाची मागणी कमी होत नाहीये. अशात शेतकऱ्याने लसणाची पेरणी कमी केली तरी मागणी तेवढीच राहील आणि त्यामुळे भाव वाढले.

पावसामुळे पिकांचे नुकसान
यंदा लसणाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे बाजारात नवीन पिकांची आवक कमी आहे. जुन्या पिकांचा साठा संपला आहे. त्यामुळेच त्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे.तसेच सध्या हवामानाचा काही भरोसा राहिलेला नाही. थोड्या थोड्या प्रमाणात का होईल हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती त्याचा परिणाम देखील लसणाच्या पिकावर झाल्याचे पाहायला मिळाले होते.परिणामी बाजारात लसणाचे शॉर्टेज जाणवू लागले असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

लग्नसराईच्या काळात मागणी वाढली
गेल्या काही महिन्यांपासून लसणाचे दर रोज वाढत आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांचा माल नाही, व्यापाऱ्यांकडे माल आहे. ते स्वतःच्या इच्छेने ते विकतात. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत मागणी वाढली आहे. घरी, लोक लसूण न घालता भाजी बनवतात, परंतु मेजवानीच्या वेळी भाज्या नक्कीच मसालेदार लागतात त्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

जुन्या लसणाच्या क्वालिटीवर परिणाम
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात लसणाची आवक झाली असली तरी मागणी कमी होताना दिसत नाहीये.अशात काही व्यापाऱ्यांकडून जुना लसूण बाजरात कमी दराने पाठवला जात असला तरी त्याची क्वालिटी तितकी उत्तम नसल्याने नव्या पिकाच्या लसणाचे दर वाढताना देखील दिसत आहेत.

काही लोक लसूण औषध म्हणूनही घेतात
साधारणपणे लोक लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी मसाला म्हणून करतात. बरेच लोक औषध म्हणून देखील वापरतात. खरं तर, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.यामध्ये असलेले पोषक तत्व आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट, प्रथिने, जस्त, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, सोडियम इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच अनेक लोक लसणाचा औषध म्हणून देखील वापर करतात.

RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार 9000 पदांसाठी बंपर भरती.. ‘जाणून घ्या’ केव्हापासून करू शकता अर्ज

भिर्रर्रर्रर्रर्र…! महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार चक्क 1 BHK फ्लॅट