11 अंध मुलांना जन्म दिलेल्या ‘या’ महिलेला का मानतात शापित?

नवी दिल्ली : जगातील प्रत्येक पालक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना जेव्हा जेव्हा काही अडचण येते तेव्हा ते त्यांच्या फायद्यासाठी सर्वस्व सोडून त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस एक करतात. पण एका आईची सगळीच मुलं आंधळी असतील तर त्या आईची काय अवस्था होईल? असेच एक प्रकरण केनियातून समोर आले आहे.

जिथे एका महिलेने 11 मुलांना जन्म दिला पण तिची सर्व मुले अंध आहेत. एवढेच नाही तर महिलेच्या पतीचे निधन झाले असून आता ती एकटीच आपल्या 11 अंध मुलांचे संगोपन करत आहे. तिला दुर्दैवी किंवा शापित समजले जाते. केनियाची रहिवासी असलेल्या अग्नेस नेस्पोंडीची ही कहाणी आहे. चला, जाणून घेऊया सविस्तर.

* 21 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले
एग्नेस नेस्पोंडी केनियाच्या किसुमु गावात राहते. तिच्या 11 मुलांच्या अंधत्वामुळे लोक तिला शापित मानतात. कारण तिने फक्त अंध मुलांना जन्म दिला होता. तिच्या पतीचे 21 वर्षांपूर्वी निधन झाले. त्याआधी तिने एकामागून एक 11 मुलांना जन्म दिल. पण ते सर्व जन्मापासूनच अंध होते. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एग्नेस एकटी तिच्या सर्व मुलांची काळजी घेत आहे. ती रात्रंदिवस काबाडकष्ट करून आपल्या मुलांना खायला घालते. तिचा मोठा मुलगा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. एग्नेसला तिच्या तरुण अंध मुलांचे संगोपन करताना खूप त्रास होतो. खूप मेहनत करूनही ती त्यांना नीट खाऊ घालू शकली नाही. अशा परिस्थितीत तिची मुले भीक मागून आईला मदत करतात.

* पहिल्यांदा गरोदर असताना झाली खूप आनंदी
एग्नेस सांगते की, तिचे लग्न झाले तेव्हा सर्व काही चांगले होते. तिला कोणतीही समस्या नव्हती आणि आयुष्य चांगले चालले होते. जेव्हा ती पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ती आणि तिचा नवरा आपल्या मुलाबद्दल खूप आनंदी होते. तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतर सुरुवातीला मूल आंधळे आहे हे कोणालाच कळले नाही, डॉक्टरांनाही हे मूल आंधळे असल्याची माहिती नव्हती. मात्र काही वेळाने अॅग्नेस आणि तिच्या पतीला संशय आला. त्यानंतर ते मुलाला घेऊन रुग्णालयात गेले.

जिथे मुलाला दिसू शकत नाही याची पुष्टी झाली. त्यानंतर एकामागून एक 11 अंध मुले जन्माला आली. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अॅग्नेसने आणखी 10 मुलांना जन्म दिला. पण तिची उरलेली मुलंही जन्मतःच अंध होती. मात्र, तिने आणि तिच्या पतीने मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. पण पती वारल्यावर तिच्या कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झाली. अॅग्नेसचे गावकरी म्हणतात की ती शापित आहे. कोणीतरी तिच्यावर काळी जादू केली. त्यामुळे तिची सर्व मुले अंध जन्माला आली.