आरोग्य केंद्रातच बायको, आरोग्यसेवकाला मारहाण

डोर्लेवाडी (वार्ताहर): मुलगी झाल्याने दारूड्या पतीने डोर्लेवाडी (ता. बारामती) प्राथमिक आरोग्य केंद्रातच पत्नीसह आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकास शिवीगाळ करून मारहण केली आहे.

या घटनेत आरोग्य सेवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामतीतील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शहर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.

बाळू चव्हाण असे मारहाण करण्यात आलेल्या आरोग्यसेवकाचे नाव आहे. तर कृष्णा काळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी अर्चना कृष्णा काळे या दाखल झाल्या होत्या.

त्यांना पहिला मुलगा असून दुसरी मुलगी झाली म्हणून दारुड्या कृष्णा काळेने आरोग्य केंद्रात येत बायकोला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यास आटकाव करण्यासाठी आरोग्य सेवक बाळू चव्हाण गेले असता त्यांना काळेने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

Leave a Comment