विकासकामांचा डोंगर उभा करणार : आ. पाटील

कराड – कराड उत्तरचे आमदार व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय संपादन केला. त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाकडून आ. बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाचव्यांदा म्हणजे रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, मोहनराव पाटील, व्ही. बी. चव्हाण, एस. जी. चव्हाण, एन. एस. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून तसेच विधानसभा सदस्य या नात्याने मतदार संघात अधिकच्या संबंधामुळे व सर्वांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात मतदार संघामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आश्वासन आ. पाटील यांनी दिले. प्रास्ताविक व्ही. बी. चव्हाण यांनी केले. मोहनराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एस. जी. चव्हाण यांनी आभार मानले.

Leave a Comment