Divorce ; भर कार्यक्रमात जिच्यासाठी उगारला लोकावर हात, आता तीच सोडणार विल स्मिथची साथ

नवी दिल्ली – जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचे पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर पुरस्कार’ ला ओळखले जात. या मानाच्या पुरस्काराकडे जगातील अवघ्या मनोरंजन विश्वाची नजर लागून असते. मात्र, यंदाच्या ऑस्कर सोहळ्याला एका घटनेमुळे गालबोट लागले.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या भर कार्यक्रमात कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

यावेळी ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने त्याचा राग अनावर झाला आणि विल स्मिथने थेट स्टेजवर जात रॉकच्या कानशिलात लगावली. जिच्यासाठी विलने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा केला, तीच आता त्याच्याशी घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त समोर येतंय.

विल आणि जाडा यांच्या वैवाहिक आयुष्यात आधीपासूनच कलह होते, मात्र ऑस्करच्या घटनेनंतर हा वाद आणखी वाढला. त्या घटनेनंतर जाडा आणि विल यांच्यात फारसा संवाद होत नसल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर जाडाने विलला घटस्फोट देण्याचं ठरवल्याचं समजतंय. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने बाबत माहिती दिली आहे.