लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये होणार फेरबदल? नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

BJP New President Update |  लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपणार आहे. जेपी नड्डा हे २०१९ मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे २०२० मध्ये हातात घेतली.

त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र आता लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दुसऱ्या व्यक्तीला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पदासाठी सध्या धर्मेंद्र प्रधान, भू​पेंद्र यादव, शिवराज सिंह चौहान, ओम माथूर आणि वसुंधरा राजे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे भाजप नेते विनोद तावडे यांचे नावही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

विनोद तावडे यांचे नाव चर्चेत 

यापूर्वी विनोद तावडे यांनी भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून काम पहिले आहे. त्यासोबतच 2014 साली राज्य मंत्रीमंडळात ते शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री होते. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.  BJP New President Update |

शिवराज सिंह चौहान आणि भूपेंद्र यादव

शिवराज चौहान यांच नाव आघाडीवर आहे. शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकसभा सदस्य आहे. २००५ साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर २००८ व २०१३ सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले. BJP New President Update |

शिवराज सिंह चौहान यांच्यशिवाय भूपेंद्र यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे विश्वासू सहकारी आहेत. दरम्यान, जेपी नड्डा यांच्याआधी अमित शहा आणि नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र आता जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक ; सुरक्षा दलांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले