नाशिकमध्ये स्वाइन फ्लुमुळे महिलेचा मृत्यू; प्रशासन अलर्टवर

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्माघातामुळे नागरिकांची तब्येत बिघडत असतानाच आता नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. स्वाइन फ्लुची लागण झाल्यामुले सिन्नरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून आणखी तीन रुग्ण सापडले आहेत.

त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. याचपार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाने काही मार्गदर्शन तत्वे जाहीर केले आहेत. सिन्नरमध्ये महिलेचा मृत्यू झाला असून आणखी तीन रुग्ण सापडले आहेत.

या तिघांवर नाशिक शहरता उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र स्वाइन फ्लुच्या संसर्गामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. पालिकेने पत्रक काढत नागरिकांना आवाहन करत विशेष सूचना दिल्या आहेत.

स्वाइन फ्लु हा रोग विषाणूपासून होतो आणि तो हवेमार्फत पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यांतून किंवा खोकल्यातून उडणाऱ्या थेंबावाटे एका रुग्णापासून निरोगी रुग्णाकडे पसरतो. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि शीतपेय पिताना सावधानी बाळगा, असे अवाहन पालिकेने केले आहे.

तसेच ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब उलटी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही पालिकेने म्हटले आहे.