पुणे जिल्हा | विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे महिला दिन साजरा

इंदापूर, (प्रतिनिधी) – महिला दिनाचे औचित्य साधून महिला तक्रार व निवारण कक्ष तसेच महाविद्यालयातील ISTE स्टुडंट चॅप्टर (MH 323) अंतर्गत विद्यार्थिनी व महिला शिक्षक वर्गासाठी स्वसंरक्षणासाठी भारतीय मार्शल आर्ट या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी एल. जी. बनसुुडे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय पळसदेव येथील प्रशिक्षक अमोल घनवट व पूजा घनवट यांनी भारतीय मार्शल आर्टचे प्रात्यक्षिके दाखविली व विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली काळे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका विद्युलता जाधव यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.