Women’s Day Special : रिअल लाईफमधील महिलांचा संघर्ष दाखवणारे ‘हे’ चित्रपट एकदा पहाच.. तुम्हालाही मिळेल प्रेरणा

Women’s Day Special movies : 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून अभिमानाने साजरा केला जातो. आजची महिला शक्ती पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग क्षेत्र खेळाचे मैदान असो वा पडद्यावरील चित्रपट महिलांचा दबदबा सगळीकडे आहे. म्हणून आज आपण अशा खास सिनेमांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये रिअल लाईफमधील विविध क्षेत्रातील महिलांची संघर्षमय कहाणी पाहायला मिळते.

जयललिता ( चित्रपट-थलाईवी )
पुरुषप्रधान राजकारणाची व्याख्याच बदलून टाकणाऱ्या जयललिता यांचा महिला दिन विशेष म्हणून उल्लेख करायलाच हवा. सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता या दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.अभिनेत्री कंगना रणौतने त्याच्या आयुष्यावर थलायवी हा चित्रपट बनवला, जो 2021 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये जयललिता यांचा सिने आणि राजकीय प्रवास उलगडून दाखवला आहे. | Women’s Day Special movies

मिताली राज ( चित्रपट – शब्बास मिठ्ठू )
भारतीय महिला क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणारी माजी कर्णधार मिताली राजने क्रिकेट जगतात महिलांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. शाब्बास मिठ्ठू हा मितालीच्या जीवनावरील बायोपिक ज्यामध्ये मितालीचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. तापसी पन्नू स्टारर, हा चित्रपट 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. | Women’s Day Special movies

गुंजन सक्सेना (चित्रपट-गुंजन सक्सेना,द कारगिल गर्ल)
गुंजन सक्सेना या भारतीय हवाई दलातील महिला अधिकारी यांनी कारगिल युद्धात आपल्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर शत्रू देशाचे मनोधैर्य तोडले होते. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन यांच्या जीवनावर आधारित गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. | Women’s Day Special movies

महाराणी लक्ष्मीबाई (चित्रपट – मणिकर्णिका)
भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या झाशीच्या राणी महाराणी लक्ष्मीभाई यांना कोण ओळखत नाही. १८५७ च्या क्रांतीमध्ये ब्रिटीश सरकारचा पराभव करणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट बनले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने देखील ‘मणिकर्णिका’ या सिनेमामध्ये महाराणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती. | Women’s Day Special movies

शकुंतला (चित्रपट – शकुंतला देवी)
गणितात तज्ज्ञ असलेल्या भारतीय महिला शकुंतलाने शिक्षण क्षेत्रात अनोखा इतिहास रचला. शकुंतला देवी नावाने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन हिने गणितातील हुशार व्यक्तिमत्त्व असलेल्या शकुंतला यांची भूमिका साकारली आहे.

गीता फोगट (चित्रपट – दंगल)
आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट दंगल ही एका भारतीय महिला कुस्तीपटूची कथा आहे जिने नॅशनल गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. क्रीडा जगतात गीताने आपल्या खेळीने देशाचा गौरव केला आहे. गीतासह हा चित्रपट कुस्तीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या फोगाट कुटुंबाची सर्वांना ओळख करून देतो.

मेरी कोम (चित्रपट – मेरी कोम)
बॉक्सिंग सारख्या खेळात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावणाऱ्या मणिपूरच्या मेरी कोमचे नावही या यादीत आहे. ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्राने 2014 साली भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमचा बायोपिक बनवला होता. प्रियांकाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला.

उषा मेहता ( चित्रपट – ये वतन मेरे वतन )
स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांच्या बायोपिक ए वतन मेरे वतनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात रेडिओचा आवाज बनून उषा यांनी सर्व देशवासियांना एक नवी प्रेरणा दिली. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. आझाद हिंद फौजेचा नारा देणाऱ्या उषा मेहता यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. ए वतन मेरे वतन लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे.