#CWC23 #NZvBAN Live Score : न्यूझीलंडला दुसरा धक्का, डेव्हॉन कॉनवे बाद तर विल्यमसनचे अर्धशतक…

World Cup 2023 New Zealand vs Bangladesh Match : विश्वचषकाच्या11व्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 246 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंड संघाच्या 28.3 षटकात 2 बाद 134 धावा झाल्या आहे. सध्या क्रीजवर केन विलियम्सन हा 50*(81) तर डेरिल मिचेल21*(18) धावांवर खेळत आहेत. त्यांना विजयासाठी 21.3 षटकात 112 धावांची आवश्यकता आहे.

न्यूझीलंड संघाल दुसरा धक्का…

डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला 92 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. तो 45 धावा करून बाद झाला. त्याने 59 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार मारले. त्याआधी 2.4 षटकात अवघ्या 12 धावसंख्येवर न्यूझीलंड संघास पहिला धक्का बसला. या सामन्यात रचिन रवींद्रची बॅट चालली नाही. 13 चेंडूत 9 धावा करून तो बाद झाला. त्याने पहिल्या सामन्यात शतक तर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होत. मात्र या सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही.

तत्पूर्वी, टाॅस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने न्यूझीलंडला 246 धावांचे लक्ष्य दिले . विकेट्स सतत पडत असतानाही 50 षटकांत नऊ गडी गमावून 245 धावा केल्या. बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 66 धावा केल्या. अनुभवी खेळाडू महमुदुल्लाहने नाबाद 41 आणि कर्णधार शकीब अल हसनने 40 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने तीन, ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.