World Poha Day 2021: आज आहे पोह्यांचा हक्काचा दिवस; या दिवसाबद्दल तुम्हाला माहितीये का?

पुणे – एखाद्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला अन्‌ कांदा पोहे नाही, तर तो कार्यक्रम ग्राह्य धरत नाहीत. ज्येष्ठ मंडळी देखील मुलीला प्रश्न विचारात “मुली तुला कांदे पोहे करता येतात ना.?

पोहे हा सर्वांच्याच आवडतीचा नाश्‍ता असून, आज या पोह्यांचा हक्काचा दिवस आहे. हक्काचा दिवस म्हणजे आज ७ जून ‘जागतिक पोहे दिन’ आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे.

म्हणूनच या दिवसाविषयी पोह्यांबद्दल थोडे जाणून घेऊयात..

1) सकाळचा नाश्‍ता हा आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. असं म्हणतात की, सकाळचा नाश्‍ता हा राजासारखा पोटभर असावा. मग नाश्‍त्यामध्ये पोहे खाण्यात येते.

2) पोह्यांचे अनेक प्रकार आहेत. पातळ पोहे, जाड पोहे, हातसडीचे पोहे, दगडी पोहे, पटणीचे पोहे असे अनेक प्रकार पोह्यांचे पाहायला मिळतात.

3) पोह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे कॉन्स्टिपॅशनची समस्या दूर होते.

4) पोहे खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पोह्यामध्ये हेल्दी कार्ब्स असतात. ज्यामुळे दिवसभर उर्जा मिळत असते.

5) पोह्यात मोठ्या प्रमाणात आयरन असतं. गर्भवती महिलांमध्ये आयरनची कमी बघितली जाते. गर्भवती महिलांनी पोहे आहारात घेणे फायद्याचं ठरू शकतं.

6) पोह्यात ग्लूटन नसते. पोटाचा त्रास असणाऱ्या लोकांनी पोह्याचे सेवन करावे.

7) पोह्यात प्रोटीन्स देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. जर पोह्यामध्ये सोयबीन किंवा सुका मेवा किंवा अंडे एकत्र करून खाल्ले तर व्हिटॅमिन आणि प्रोटिन्स भरपूर मिळते.

8) कधी कधी पोहे खाऊन पित्त होण्याची तक्रार असतात. पोह्यात तेल जास्त झालं तर ऍसिडिटी होण्याची शक्‍यताही असते.

9) चहा बरोबर पोहे घेतल्यास अधिक अपायकारक. चहा बरोबर मिठाचे पदार्थ खाल्यास पोट बिघडण्याची शक्‍यताही असते.