इंद्रायणी नदीत साधकांची ग्रहणकाळात उपासना

आळंदी (वार्ताहर) – सूर्यग्रहण काळात उपासकांनी रविवारी (दि. 21) इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून उपासना केली.
आळंदी मंदिरात ज्येष्ठ वद्य अमावस्या दिनी सूर्यग्रहणाच्या मोक्षानंतर आळंदी संस्थानचे विश्‍वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांची पूजा, अभिषेक माउली मंदिर दर्शन बारी सभागृहात करण्यात आला, तसेच ग्रहण काळातील उपचार परंपरांचे पालन करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.

आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाण्यात उभे राहून सूर्यग्रहण काळात अनेक साधकांनी साधना केली. या काळात ग्रंथ पठण, मंत्र, जप, साधना, तसेच या अनुषंगाने विविध धार्मिक विधी करीत परंपरेचे पालन केले.

इंद्रायणी नदीत साधकांनी उघड्या अंगाने साधना करीत सूर्यग्रहण पूर्ण होताच इंद्रायणी स्नान करून पूजापाठ नामसाधना केली. सकाळी दहा ते दुपारी दीड या कालावधी सूर्यग्रहण असल्याने यावेळेत साधकांनी यावेळी साधकांनी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत नदीत उभे राहून सूर्यग्रहण पाळले.

Leave a Comment