भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी WWE स्टार ‘द रॉक’ उत्सुक, शेअर केला खास व्हिडीओ…

The Rock – टी-२० विश्वचषकच्या सुपर-१२ मध्ये भारताचा पहिलाच सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमधील हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. केवळ भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच नव्हे तर इतर अनेक देशांतील क्रीडाप्रेमीही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. महत्वाचं म्हणजे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी WWE सुपरस्टार ‘द रॉक’ देखील उत्सुक आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) सुपरस्टार द रॉक ( Dwayne Johnson ) ने एका व्हिडिओद्वारे खास संदेश दिला आहे.

विराट कोहलीसोबत फोटो काढला अन काही वेळातच सोशल मीडियावर बनली स्टार

द रॉकचा ( The Rock ) हा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स या ब्रॉडकास्टर चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना द रॉक म्हणाला की, “जेव्हा जगातील दोन सर्वात मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतील, तेव्हा संपूर्ण जग स्थिर असेल. ही वेळ क्रिकेट सामन्यापेक्षा जास्त महत्वाची असणार आहे. भारत-पाकिस्तान या मोठ्या सामन्याची वेळ जवळ आली आहे.”

विश्वचषकातील अनेक सामन्यांवर पावसाचे सावट 

गुरुवारी रात्री मेलबर्नमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान अंदाजानुसार पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. Accuweather ला मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये जोराचा पाऊस पडू शकतो. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर २३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सध्या तरी भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट मानले जात आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान संघ

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

पाकिस्तान संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान ( उपकर्णधार), आसिफ अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान ( यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.