एक मोठा पक्ष काॅंग्रेसमध्ये होतोय विलीन

हैदराबाद – वायएसआर तेलंगणा पक्षाच्या संस्थापक वाय. एस. शर्मिला त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण्याच्या प्रस्तावला अंतिम रूप देण्यासाठी बुधवारी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत आपण मल्लिकार्जून खर्गे राहुल गांधी आदी सर्वोच्च नेत्यांना भेटणार आहोत असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा उद्या दिल्लीतच होण्याची अपेक्षा आहे.

शर्मिला या अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या असून त्या आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या धाकट्या भगिनी आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिला यांना राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसमध्ये एक पद दिले जाईल आणि वायएसआरटीपी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर त्यांना दक्षिणेकडील राज्यांच्या निवडणुकांचे प्रभारी बनवले जाण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल. कृपया धीर धरा, असे शर्मिला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस नेतृत्वाने शर्मिला यांना आश्वासन दिले की तेलंगणातील त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य स्थान दिले जाईल.