योगिता आणि सौरभने लग्नानंतर घेतलं नवं घर; गृहप्रवेशाचे शेअर केले फोटो

Yogita And Saurabh New Home|  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. सौरभ आणि योगिताने कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला‘ या मालिकेत एकत्र काम केले होते. या रिल लाइफ कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आता या दोघांनी नवीन घर घेतले आहे. नुकतेच त्यांनी गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेता सौरभ चौघुलेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत सौरभ योगितासह घरात गृहप्रवेश करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नव्या घराची नेमप्लेट दिसत आहे. यावर सौरभ आणि योगिता या दोघांचं नाव लिहिले आहे. नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सौरभने लिहिले की, ’एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया, नवीन शहरात, नवीन संसार थाटूया…आमच्या नव्या सुरुवातीसाठी चेअर्स.” सौरभ आणि योगीताचे हे नवे घर पवईमध्ये आहे. तसे त्याने या पोस्टमध्ये मेन्शन देखील केले आहे. Yogita And Saurabh New Home|

सौरभ चौघुलेने शेअर केलेल्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. योगिता आणि सौरभच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, या दोघांनीही ‘जीव माझा गुंतला‘ या मालिकेत एकत्र काम केले होते. सौरभ यानंतर सन मराठीवरील ‘सुंदर‘ या मालिकेत दिसला होता. यात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. Yogita And Saurabh New Home|

हेही वाचा: 

राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या